पोस्ट्स

जून, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नातं सात जन्माचं

इमेज
*नातं सात जन्माचं* सात फेऱ्यांसोबत असेल  सात जन्माची साथ आयुष्याची गोडी चाखू घेउनी हातात हात  मी वटवृक्ष संसारातील तू पारंब्या सुखाच्या  प्रेम हेच अंतिम सत्य बाकी गोष्टी फुकाच्या सावित्री सत्यवान सारखा नको आणूस परत प्राण समजून घेऊन एकमेका हे जीवन जगू छान तुझ्या पाणीदार डोळ्यात  सात जन्माचं सुख दिसत मन माझं स्पंदन होऊन तुझ्याच  हृदयात हसतं मी आधारवट कुटुंबाचा तू पौर्णिमा त्याची शीतल तुझ्या श्वासात सखे नकळत काळीज रुतल ✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233