पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*त्यांना कुठे पडतो फरक....*

इमेज
*त्यांना कुठे पडतो फरक....* आपण रुसलो रागावलो तरी ज्यांना पडत नाही फरक आपण पण बोलायचं त्यांना ये भावा बाजूला सरक जे देतील आपल्याला अगदी मनापासून साथ  त्याच्याच हातात मग आवडीने द्यायचा हात आपण जग सोडून गेलो तरी  ज्यांना होणार नाही दुःख का आयुष्य झिजवायचं  त्यांच्यासाठी अख्ख  आपल्यात विनाकारण जे दोषच असतात शोधत कुठवर बसायचं त्यांच्यासाठी आपण सुख खोदत ज्यांनी कधी आपल्याला आपलं मानलचं नाही आपण असलो नसलो तरी  त्यांना फरक पडत नाही जो देईल आपल्याला  त्याच्या हृदयात जागा त्यांच्यासाठीच विणू हा मैत्रीचा सुरेख धागा ✍✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी मो. 8424043233