किती दिवस झाले........

*किती दिवस झाले* किती दिवस झाले पाहिले न मी तुला अर्घ्य प्रीतीचे सखे वाहिले न मी तुला किती दिवस झाले कुठे गेला एकांत अश्रूनाच कळला फक्त या जीवाचा आकांत किती दिवस झाले दर्शन नाही तुझे थंडावलेल्या नरम ओठांचे घर्षण मनी रुजे किती दिवस झाले मी अतृप्त तू अधुरी इच्छा मनातली ती होईन कधी पुरी किती दिवस झाले नयनात तसेच पाणी विरहात आता ही सरत चालली जवानी ✍✍✍✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मोबाईल नंबर 8424043233