पोस्ट्स

डिसेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*पहिला पाऊस मी आणि ती.....

इमेज
  *पहिला पाऊस मी आणि ती* पहिला पाऊस आणि ती अंथरुणाला मग खिळते  भीत भीत माझी नजर त्या किचन कडे वळते पाहून कपड्यांचा ढिगारा धडकी भरते मला आपोआपच अवगत होते मग ती कपडे धुण्याची कला पावसासोबत सुरू असतो बाहेर गारांचा सुरेख मारा डोळ्यासमोर दिसतो मात्र खरकट्या भांड्यांचा ढिगारा पोरांचं आवरता आवरता मग तोंडाला येतो फेस बरी वाटते तेव्हा मला ती ptc ची मेस कधी खारट कधी तिखट फोडणी देतो भेंडीला करताना ही कसरत सारी जीव येतो रडकुंडीला सुरू होते अचानक मग थंडी तापाची व्याधी पहिल्या पावसात ती आणि मी भिजलोच नाही कधी ✍✍✍✍✍✍✍✍ कवी आपलेच अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी