पोस्ट्स

जानेवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गाथा पराक्रमाची

इमेज
*पॅरा कमांडो शौर्यचक्र प्राप्त  मधुसूदन सुर्वे यांच्या शौर्याची गाथा* सात गोळ्या लागूनही पायात तो निधड्या छातीने  लढला मधुसूदन सुर्वे नाव त्याच दहशतवाद्यांना वादळ होऊन भिडला स्वतःचा पाय ही त्याने  कापला स्वतःच्या हाताने खचून जायचं नसतंच कधी त्या दुश्मनाच्या आघाताने असह्य वेदना तरी त्याने दहशतवादी मिळवला मातीत अभिमानाने मिरवला तिरंगा या भारत भु च्या छातीत भारतभूमीसाठी सांडलेले रक्त फक्त आपल्या रक्षणास्तव आहे आतडी कृत्रिम असली तरी ते जगणं मात्र वास्तव आहे दुःखाला कवटाळून बसण्यापेक्षा हास्याच पांघरून त्यावर झाकावं मृत्यू डोळ्यासमोर असताना झुंझणही त्यांच्याचकडून शिकावं खरे हिरो तर मित्रांनो हेच आहेत आपले ज्यांनी ह्रदयात जीवापाड हे देशप्रेम जे जपले ✍✍✍✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233