झोपलाय सारा गाव अन झोपलाय सारा गाव गावात काय चाललंय कुणाला न ठावं चोर लुटारू मारतायत ताव त्यांना सोन्या चांदीचा हाव इथं गुन्हेगार बनतोय साव झोपलाय सारा गाव अन झोपलाय सारा गाव रात्री जागत नव्हतं एक बी कुत्रं आणि होतं ते भी मरणाचं भित्र अश्या या गावाचं वेगळंच चित्र वैऱ्याप्रमाणे वागत होते जिवलग मित्र हे मित्र जोडायला सांगा कुठे जावं झोपलाय सारा गाव अन झोपलाय सारा गाव या गावाची काय सांगावी तऱ्हा भलताच इथे प्रत्येकाचा तोरा कुणी इथे भाई तर कुणी इथे दादा फक्त फसवा गाव सुधरावयाचा वादा हा वादा पूर्ण करायला पुढं कुणी यांव ...