कर्तव्यापेक्षा श्रेष्ठ त्याला.......

*कर्तव्यापेक्षा श्रेष्ठ त्याला* गणपती गेले अन आली पहा नवरात्र तो मात्र उभा असेल बंदोबस्तासाठी अहोरात्र तो कधीच थकत नाही तो कधीच थांबत नाही कर्तव्यापेक्षा श्रेष्ठ त्याला आणखी काहीच नाही आपण करू मज्जा अन घालू धिंगाणा तो मात्र कधीच नसतो घरी कुठल्याच सणा कदर केली तुम्ही तर त्यालाही येईल हुरूप आनंदमयी होऊन जाईल पहा सण उत्सवाचे हे रूप ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233