पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Pranali jadhav koregaon

*दीड वर्षांपूर्वी टिकटॉक वर सरांचे पुस्तक पाहिले तेव्हापासून सरांचा नंबर शोधत होते* आणि योगायोगाने काही दिवसांपूर्वी तो फेसबुक वर मला मिळाला तेव्हा सरांनी दुसरा चारोळीसंग्रह प्रकाशित केल्याचे मला समजले आणि मी तो ताबडतोब मागवून ही घेतला...... *कालच सरांचा नूतन चारोळीसंग्रह मिळाला .आज मी तो संपूर्ण वाचला.प्रथमतः आपले अभिनंदन!💐*  तुमच्या कविता आणि चारोळ्या खूप छान असतात आणि त्या वाचताना मनाला स्पर्शून जातात खरंच सर आपले पुस्तक वाचून एक वेगळी प्रेरणा मिळाली, मस्त वाटले👌या जगात अशक्य असं काहीच नाही.त्यासाठी फक्त प्रबळ इच्छाशक्ती हवी आणि त्याच इच्छाशक्तीमुळे..  तुम्ही पोलीस खात्यात असून तसेच पोलीस खात्याचा एक भाग असूनही साहित्य क्षेत्रात ही आपण पंख पसरले आहेत.त्यासाठी अभिनंदन सर..💐 *खरंच सर तुमचा खूप अभिमान वाटतो जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही तुम्ही तुमच्या कष्टाने खाकी वर्दीतील दर्दी कवी हे नाव काव्यसंग्रहाला देऊन महाराष्ट्रात प्रसिद्ध केले सर तुमच्या पुढील साहित्यिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.💐* 👍All the best sir👍     ...