प्रथम पुण्यस्मरण

*आपल्या मरोळ PTC येथील महिला प्रशिक्षणार्थीं जोत्स्ना खांडेकर यांच्या पतीच्या प्रथम पुण्यस्मरण* *दिनानिमित्त मी लिहलेली ही कविता* *नक्कीच आपल्या हृदयास स्पर्शून जाईल.....* *प्रथम पुण्यस्मरण..* आठवणीत आपल्या असंख्य टिपे गळाली आपल्यामुळेच तर खरी ही वर्दी मला मिळाली एकटीच गात आहे या आयुष्याचे बेसूर गीत जेव्हा पासून तुम्ही सोडून गेलात सुमित आठवण तुमची मनात अगदी क्षणोक्षणी आहे त्या आठवणीविना सांगा मला दुसरं कोणी आहे तुमच्या माघारी मी जरी मन केले घट्ट तुम्ही परत यावे असा धरू कोणाजवळ हट्ट कसा घालू तुम्हीच सांगा डोळ्यातील अश्रूंना आवर काही ओळी सुचल्या कशाबशा त्यातही वरून दोन थेंब त्यावर ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी