पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पारसमणी

 *पारसमणी* सुखी संसाराचं स्वप्न  असतंच प्रत्येकाच्या मनात गुपित नकळत मनातलं बोलतो हळुवार कानात आपल्या बोचऱ्या विनोदावर तिनं खळखळून हसावं  धडधड बनून तिचं रूप हृदयात खोलवर बसावं संसाराचा गाडा हाकणारी काळजीवाहू अर्धांगिनी ती आपल्या दुःखाच्या खिशातील आनंदाची पॉकेटमनी ती मन दुखावलं आपलं कुणी की ती ही जातेच की खचून भिंत खंबीर करते मनाची वीट पुन्हा आधाराची रचून दोघांशिवाय इतकं एकमेकांना सांगा ना जपतं का कुणी बायको म्हणजे संसारगळ्यातील लाभदायी एक पारसमणी ✍✍✍✍✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक  अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233