पोलीस भरती *पोलीस भरती....* पोलीस होण्याचं स्वप्न तू उतरव आता सत्यात संधी पुन्हा पुन्हा येत नसते येण्या पोलीस खात्यात सोळाशे मीटर मित्रा तू अगदी जीव तोडून धाव मेरिट लिस्ट मध्ये येउदे दणक्यात तुझं नावं जिद्द मनात ठेऊन असा फेक गोळा आई वडिलांनी जे स्वप्न दाखवले डोळा रात्र रात्र जागून तू कर पक्की लेखी अंगावर चढलीच पाहिजे रुबाबात यंदा खाकी तुझ्या मेहनतीचा इथे कस लागूदे सगळा इतिहास घडवून दाखव असा जगावेगळा ✍️✍️✍️✍️✍️✍️ PSI अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो :- 8424043233