वेड असू शकतं कशाच ही.. वेड असू शकत कशाच ही आपण जिंकणारच या भ्रमात राहून झाडाखाली गाढ झोपलेल्या शर्यतितील सश्याच ही वेड असू शकतं कशाचं ही पाण्यात प्रतिबिंब पाहून लक्षाचा अचूक वेध घेणाऱ्या महाभारतातील माशाच ही वेड असू शकतं कशाचं ही गरिबीच्या यातना सहन करत परिस्थिती ने पदरी पडलेल्या फाटक्या खिशाच ही वेड असू शकतं कशाचं ही मांडीवर थाप मारून प्रतिस्पर्ध्याला ललकारणाऱ्या पिळदार मिशाचं ही वेड असू शकतं कशाचं ही मनातलं सगळं दुःख लपवून मित्र मंडळीसोबत पिकलेल्या निरागस अश्या हशाच ही वेड असू शकतं अगदी कशा कशाचं ही गरमागरम भाकरी सोबत वरपणाऱ्या मटणाच्या रशाचं ही वेड असू शकतं कशाचं ही प्रेयसीच्या गालावरून हळुवार फिरवलेल्या आठवणीतील मोर पिसाच ही ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ PSI अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो :- 8424043233