जी होती मनात...
*जी होती मनात..* जी मनात होती मित्रांनो नेमकी तीच नाही मिळाली माझी साधी भोळी प्रीत तिला कधीच नाही कळाली तीच मनमोहक रूप डोळ्यांना घालायचं भुरळ ती अल्लड नखरेवाली माझा स्वभाव मात्र सरळ डोळ्यात साठवायचो रोज तीचं देखणं रूप जिवापेक्षा ही जास्त ती आवडतं होती खूप ती मिळावी म्हणून मी काय काय नाही केलं आयत्या वेळी मात्र होत्याचं नव्हतं झालं मनात असूनही ती दुसरी सोबत संसार थाटला तुम्हीच सांगा मित्रांनो तुम्हाला दर्दी कवी खरच असा वाटला काळेकुट्ट केस तिचे अन लाल तिची साडी होती दुसरं तिसरं कोणी नाही मित्रांनो मला आवडलेली ती एक गाडी होती ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो:- 8424043233