पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उभरती पाखरे

इमेज
आभाळ मुक्त झालं आज  उभरत्या पाखरांना मुक्त हस्ताने गवसनी घाला तुम्ही उत्तुंग शिखरांना शहाणपणाच्या दुनियेत हे  पाऊल तुमचं पहिलं एक टप्पा तर पार केला  आता बाकी काय राहिलं  नव्याने प्रयत्न करताना ही दुनिया तुमच्यावर हसल जिद्दीच्या जोरावर आई वडिलांचे तुम्ही नाव करा रोशन येणाऱ्या अडचणीवर मात करा ध्येर्याने दाही दिशा उजळूद्या  तुमच्या अलौकिक शोर्याने तुमच्या निरागस डोळ्यात  गोंडस स्वप्न त्यांचं फुलूदे तुमच्या यशाच्या झोपाळ्यावर मनसोक्त त्यांना झूलूदे एक मात्र तुम्ही  पक्क स्वतःशी ठरवा खच्ची होणाऱ्या मनाला आत्मविश्वासाने हरवा संघर्षाच्या मैदानात संकटाशी नजर भिडवा  बघतच राहतील ते तुम्ही इतिहास असा घडवा ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो :- 8424043233