आठवणींचा कप्पा

जवळ जवळ दीड ते दोन महिन्यांनी आज नवीन कविता सुचली नक्कीच आवडेल मित्रांनो आपणास ही कविता.... 👍 *आठवणींचा कप्पा....* प्रत्येकाच्याच मनात असतो एक आठवणींचा कप्पा स्वतःच स्वतःशी तो एकांतात मारत राहतो गप्पा काही सुखद तर काही आठवणी असतात तिखट आयुष्याचा आनंद असा कोण देत असता का हो फुकट आठवणीच जग हे खूपच आहे विशाल जीवनाचा आनंद घेत त्यात हरवून जातो खुशाल काही सुंदर आठवणींने हळूच हसू उमटते गालात दुःख ही देतात त्या खूपच गेलं कि खोलात जेव्हा कोणीच नसतं सोबतीला तेव्हा त्याच्यावरव माणूस जगतो शिकलेला संज्ञान असूनही तो लहान लेकरासारखा वागतो भान सारं हरपून तो गत आठवणीत रमतो आयुष्याचा सगळा हिशोब शेवटी इथेच तर जमतो आयुष्य जगण्यास बळ आणायचं कुठून उधार उतारवयात खरंतर त्यांचाच तर असतो आधार ✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो:- 8424043233