पोस्ट्स

संकल्प नववर्षाचा

इमेज
*😇 संकल्प नववर्षाचा😇* फक्त एकदा झळकायचं मला इतिहासाच्या पानात अन हृदयात जीवापाड जपलेल्या जीवलगांच्या  मनात जे जे लिहलय आजपर्यन्त ते सुवर्ण अक्षरात दिसावं खाकी वर्दीतील दर्दी कवी हे नाव तुमच्या काळजात बसावं एक यावी अशी संधी कायापालट होईल जीवनाचा माझी प्रत्येक कविता मग ठाव घेईल मना मनाचा तुम्ही दिलेल्या स्फूर्तितूनच हे शब्दांचे रचले इमले सुख दुःख लपंडाव खेळून हृदयात खोलवर लपले उलगडताना अलगद इतिहासाची पाने तुमच्या परिस स्पर्शाने व्हावे  माझ्या अक्षरांचे सोने नवीन वर्षात सांगा आता काय करणार संकल्प तुमच्या विशाल हृदयात मला फक्त जागा द्या अल्प तुमच्या विशाल हृदयात मला फक्त जागा द्या अल्प ❤❤❤❤       अजय दत्तात्रय चव्हाण         उर्फ (राहुल) 💫खाकी वर्दीतील दर्दी कवी💫           8424043233            ✍✍✍✍

Happy new year 2018

इमेज
Happy New YEAR 2018 असं कसं विसरू मित्रा हे वर्ष दोन हजार सतरा हृदयात भरवून गेला हा दोस्तांच्या कित्येक यात्रा काही जिवलग तर काही मनास स्पर्शून गेले या निरस जीवनाचे नंदनवन करून गेले काय नाही दिल याने  मनासारखं सगळं घडलं तरीही दोन हजार अठराचं घेणं सर्वांना पडलं असो पण पुढील वर्षात ही आपण  दोस्ती आपली निभवायची अन माणसं जपायची हृदयापासून आपल्या जिवाभावाची  सुख दुःख येतील अनेक कित्येक येतील अडचणी पण साथ नाही सोडायची अश्या बिकट क्षणी आनंदात जाओ  सुखात जाओ 2018 मध्ये आपली  भरभराट होवो खाकी वर्दीतील दर्दी कवीच्या  कविता वाचायला ऑनलाईन नक्की या हो ✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

छानशी एक कविता करावी म्हटलं

इमेज
छानशी एक  कविता करावी म्हटलं डोळ्यातील पाणी डोळ्यातच आटलं  अटलेल्या आसवांच हृदयाने केलं स्वागत श्वास स्तब्ध होऊन बसला माझ्याकडेच पाहत  पाहणाऱ्या श्वासाला मित्रांनो शब्दात केलं कैद  कविता मग बघा बनली अशी ही अभेद्य  अभेद्य माझ्या कवितांना मित्रांनो तुमच्या हृदयात द्या स्थान तुमच्या साठीच पिकवतो मी हे शब्दांचे सुंदर रान रान शब्दांचे असले तरी मी त्यात माझा जीव ओतला आहे शब्द जरी मुके असले तरी आवाज मात्र आतला आहे या आतल्या आवाजाला दोस्ताना आवडीने घाला साद  नक्कीच मधुर होईल पहा हा  जीवन जगण्याचा स्वाद... नक्कीच मधुर होईल पहा हा  जीवन जगण्याचा स्वाद... अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.न. 8424043233

ईद मुबारक

इमेज
*ईद की शुभकामनाए* ईद का शिरकुरमा हो या हो दिवाली की मिठाई दोस्ती निभाएंगे जी जान से ये कसम हमने है खाई अल्लाह का दर्गा हो  या हो भगवान का  मंदिर तोड देंगे हम ये जात पात की जंजिर भगवान की कृपा हो या हो अल्लाह का रहम  भाई भाई है हम  ये दिल से कहे हम रामराम हो या  हो सलाम वालेकुम हर दिल मे गूंजे ये दोस्ती की नई धुन ईद का नमाज हो या हो भगवान की आरती भूलकर सारे गीले शिकवे खिल जाए ये भारत धरती शब्दरचना अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ (राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233
इमेज
🇮🇳🙏 वीर मरण 🙏🇮🇳 चटका लावून गेले जीवाला त्यांचे वीरमरण शतजन्म त्यांचे आपण पुजीत राहवे चरण...॥॥      देशभक्ती नसानसात भीनलेली    शत्रुशी लढताना     ही मातृभूमी ही भारावली         प्राण त्यांनी सोडताना..॥                                  मातृभूमीला वाहिले त्यांनी                                   आपल्या देहाचे तोरण.......             चटका लावून गेले जीवाला त्यांचे वीरमरण॥ दुष्मनांची केली राख होऊंन त्यांनी आग श्रेष्ठ त्यांचे बलिदान श्रेष्ठ त्यांचा त्याग॥             शौर्य त्यांचे असे                         दुश्मन ही आले शरण......           चटका लावून गेले जीवाला त्यांचे वीरमरण ...
*अंगाई* आई गाते अंगाई सारे विसरून जाई चंद्र लपला ढगात आई सांगते कानात नाही केलास अभ्यास तर बाई मारतील वर्गात आई सांगते ताईला बाळ माझा हुशार करील अभ्यास सारा कसा खाईन मार चंद्र तारे येती स्वप्न मुलांना देती घेवुनी गोड पापा आई कुशीत घेती मुले आवडती साऱ्यांना चमचमणाऱ्या ताऱ्यांना.. अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

लग्नसोहळा

इमेज
लग्नसोहळा लग्नसोहळा आपला भारी नवजीवनाची उंच भरारी सजला मंडप तुझिया दारी मज वाटला तो स्वर्गापारी फुटली ती मग सुपारी हळद लागली त्या दुपारी रंग पिवळा तो चढता हाती लाजलो होतो आपण किती माझ्यासंगे मंदिरी चालता ईश्वरी आशीर्वाद तो मिळता स्वप्नी संसाराच्या तू न्हाली लग्न घटिकेची ती वेळ झाली पारणे फेडतो सजण्याचा थाट हटता तो अंतरपाट गुंफली जीवनाशी प्रेम गाठ मंगल अष्टकांचा तो स्वर फुले अक्षदा डोईवर नामस्मरण ईश्वराचे विडा मुखात  ठरले मनाशी ठेविन सुखात हळदी कुंकवांनी रंगले पात्र भटजी पुटपुटती मंगल मंत्र घातले गळी मंगळसूत्र धरले तुजवरी मायेचे छत्र गळी फुलांचा हार पडला लग्नसोहळा तो पार पडला तुझ्यासंगे तो क्षणही रडला ज्यावेळी तू माहेर सोडला अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी ✍✍✍✍✍✍ 8424043233