पोस्ट्स

गाथा पराक्रमाची

इमेज
*पॅरा कमांडो शौर्यचक्र प्राप्त  मधुसूदन सुर्वे यांच्या शौर्याची गाथा* सात गोळ्या लागूनही पायात तो निधड्या छातीने  लढला मधुसूदन सुर्वे नाव त्याच दहशतवाद्यांना वादळ होऊन भिडला स्वतःचा पाय ही त्याने  कापला स्वतःच्या हाताने खचून जायचं नसतंच कधी त्या दुश्मनाच्या आघाताने असह्य वेदना तरी त्याने दहशतवादी मिळवला मातीत अभिमानाने मिरवला तिरंगा या भारत भु च्या छातीत भारतभूमीसाठी सांडलेले रक्त फक्त आपल्या रक्षणास्तव आहे आतडी कृत्रिम असली तरी ते जगणं मात्र वास्तव आहे दुःखाला कवटाळून बसण्यापेक्षा हास्याच पांघरून त्यावर झाकावं मृत्यू डोळ्यासमोर असताना झुंझणही त्यांच्याचकडून शिकावं खरे हिरो तर मित्रांनो हेच आहेत आपले ज्यांनी ह्रदयात जीवापाड हे देशप्रेम जे जपले ✍✍✍✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

*पहिला पाऊस मी आणि ती.....

इमेज
  *पहिला पाऊस मी आणि ती* पहिला पाऊस आणि ती अंथरुणाला मग खिळते  भीत भीत माझी नजर त्या किचन कडे वळते पाहून कपड्यांचा ढिगारा धडकी भरते मला आपोआपच अवगत होते मग ती कपडे धुण्याची कला पावसासोबत सुरू असतो बाहेर गारांचा सुरेख मारा डोळ्यासमोर दिसतो मात्र खरकट्या भांड्यांचा ढिगारा पोरांचं आवरता आवरता मग तोंडाला येतो फेस बरी वाटते तेव्हा मला ती ptc ची मेस कधी खारट कधी तिखट फोडणी देतो भेंडीला करताना ही कसरत सारी जीव येतो रडकुंडीला सुरू होते अचानक मग थंडी तापाची व्याधी पहिल्या पावसात ती आणि मी भिजलोच नाही कधी ✍✍✍✍✍✍✍✍ कवी आपलेच अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी

किती दिवस झाले........

इमेज
*किती दिवस झाले* किती दिवस झाले  पाहिले न मी तुला अर्घ्य प्रीतीचे सखे वाहिले न मी तुला किती दिवस झाले कुठे गेला एकांत अश्रूनाच कळला फक्त या जीवाचा आकांत किती दिवस झाले  दर्शन नाही तुझे थंडावलेल्या नरम ओठांचे घर्षण मनी रुजे किती दिवस झाले  मी अतृप्त तू अधुरी इच्छा मनातली ती होईन कधी पुरी किती दिवस झाले नयनात तसेच पाणी विरहात आता ही सरत चालली जवानी ✍✍✍✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मोबाईल नंबर 8424043233

अजीब सा प्यार.....

इमेज
*अजीब सा प्यार* बेशुमार प्यार है हमसे एक बार दिल से बोल दो तभी आदेश आता है सीखे हुए तरीके से रायफल को खोल दो चुभता है जब भी मुझे तेरी जुदाई का काटा तब याद आता है मुझे वेपन का जनरल डाटा तुझे दिल में ढूंढे कही  इतनी फुरसत भी नहीं है ग्रिड नार्थ को दर्शाती वो बैंगनी रेखा वहीं है कैसे निभाए हम बोलो  प्यार में फिर भी वफाई फुलत्रु दरी लेकर तब होती है रायफल सफाई चुपके के से जता देता प्यार ए दिल भी शायद कायर तभी हुक्म मिलता है 5 गोली एप्लिकेशन फायर मुझपे जरूर चढ़ता तेरे मोहब्बत के असर का जाम तभी होता है सवाल मुझसे AKM में रेट रेड्यूसर का क्या काम उंगलियोंसे सुलझाता मैं फिर भी तेरे बाल को कैसे याद रखु सोचता हूं इस वेपन की चाल को अब तो तेरी मर्जी है तू  दे दे मुझे जो भी फाइन तेरा दिल भी लगता है मुझे अब वो कन्वेंशनल साइन तेरे मेरे प्यार की शायद  यही एक परिभाषा है तू समझ लेगी मुझे यकीनन यही मेरी आशा है ✍✍✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

व्यसन दारूचे.......

इमेज
*व्यसन दारूचे* हजारो संसार उध्वस्त होतात या दारूच्या व्यसनापाई तरीही सांगा लोकांची का ही दारू सुटता सुटत नाही  आम्ही आमच्या पैशाची पितो म्हणे कुणाच्या बापाची नाही  काळजी का तुम्हास मग त्या  चिमुकल्या रोपाची नाही  डोळे झाकून दारूचा घोट रिचवला जातो घश्याआड घाबरत घाबरत छोटीशी परी लपते आईच्या पदराआड दारू पिल्यावर म्हणे आमची दुःखे सारी हलकी होतात स्वतःच्या शरीराची नासाडी ते स्वतःच अशी करून घेतात डोळ्यासमोर पाहतो माझ्या रोज अशी जिवंत उदाहरणे का कळत नाहीत हो त्यांना  दारूच्या विनाशाची कारणे थांगपत्ता ही लागत नाही या अनावश्यक गरजांचा  दारूच्या व्यसनापाईच मग तो डोंगर होतो कर्जाचा हुंदका गिळून सहन करते ती रोजच्या त्याच्या त्रासाला अश्रूंच्या धारा विचारतात तिच्या अहो असलं व्यसन कशाला दुर्दशा स्वतःच्या संसाराची उघड्या डोळ्यांनी बघवत नाही आतून खंगत असते बिचारी मात्र बोलवंत काहीच नाही लिव्हर खराब होतो त्याचा ती किडनीही होत असते बाद दुष्परिणाम पाहून तरी निदान तो दारूचा सुटावा ...

चंद्रयान 2...

इमेज
*दर्दी कवीच्या लेखणीतून.... ✍* *चंद्रयान 2* ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होऊ देशाने  स्वप्न बाळगले उराशी  श्वास थांबला नजरा रोखल्या त्या टाळ्याही थंडावल्या जराशी यशस्वीरीत्या पूर्ण केला त्याने लाखो किलोमीटरचा प्रवास एका क्षणासाठी थांबलाच ना करोडो भारतीयांचा श्वास पाऊल ठेवणारच चंद्रावर तेवढ्यात विक्रमचा संपर्क लागला घसरू देशप्रेम आहे हृदयात म्हटल्यावर डोळ्यातून ओघळणारच ना अश्रू  डोळे पाणावले अक्षरशः बांध ही फुटला अश्रूचा प्रत्येक भारतीयास आज अभिमान वाटतो इस्त्रोचा सम्पर्क तुटला जरी लँडरचा  शास्त्रज्ञांची जिद्द नाही तुटली करावया फत्ते मोहीम चंद्रयान पुन्हा आग या उरात पेटली पुन्हा आग या उरात पेटली ✍✍✍✍✍✍✍ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

*शेतकऱ्याचं स्वप्न*

इमेज
*शेतकऱ्याचं स्वप्न* पाणी देतो ऊसाला स्वप्न घेऊन उशाला आज लावलं बेनं उद्या होईल सोनं तरारतील हिरवी पानं पाखरं गातील गानं                   मग कुणाची मला  भीती कशाला                 पाणी देतो ऊसाला  स्वप्न घेऊन उशाला  दिवस असो की रात्र ऊन असो की सावली फुलविण्या फड उसाचा मेहनत सारी लावली            उन्हामधी राबून कोरड पडली घश्याला             पाणी देतो ऊसाला   स्वप्न घेऊन उशाला  कानी आवाज येतो मंजुळ पाणी पाटाचं वहात झुळझुळ माझे कष्ट पाहुनी पाऊस रडतो मुळूमुळू               आनंदले मन पाहून सशाला                पाणी देतो ऊसाला  स्वप्न घेऊन उशाला  फड आला तुऱ्याला ऊस भीडं डोक्याला ऊस जाईल कारखान्याला पैका मिळणं संसाराला                पैका ...