पोस्ट्स

Hc देविदास केरकळ

 सर खरेतर आपले नाव मी खूप ऐकले होते परंतु आज दैवयोगाने भेट झाली खूप खूप आनंद झाला तसे पाहिले तर आपणाला पाहून असे वाटले यांना मी रोज कुठेतरी पाहतोय क्षणात तुमची नेमप्लेट पाहिली आणि नाव वाचल्यावर लगेच तोंडातून शब्द बाहेर पडले खाकी वर्दीतील दर्दी कवी आपणच का??. .  आणि आपले उत्तर आले हो खरंच सर आपल्याला पाहून खूप प्राऊड फील झाले कारण सोशल मीडियावर 👌🏻आपल्या कविता खूप वेळा वाचल्या तेव्हापासून मनात इच्छा होती हे कवी कुठे भेटतील आणि आज साक्षात आपली भेट झाली😘😘😘😘😘😘😘

शहीद जवान सोमनाथ मांढरे

इमेज
  * साताराः * वाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांना लडाख येथे देशसेवा बजावताना वीरमरण आले. त्यांच्या पवित्र स्मृतींना खाकी वर्दीतील दर्दी कवीची ही शब्दरूपी श्रद्धांजली.... 💐💐💐💐💐💐💐 * शहीद जवान सोमनाथ मांढरे * दुःखात अखंड बुडाले काल छोटेसे गाव सगळे आसले देशासाठी शहीद झाले ते अजून मरण हवे तरी कसले त्यांच्या जाण्याने हळहळले संपूर्ण सातारा अन वाई धूमसून धुमसून रडत असेल त्या गोंडस लेकरांची आई एका क्षणात होऊन गेले कपाळ तिचे पांढरे अनंतात विलीन झाले जवान सोमनाथ मांढरे मुलगा आठ वर्षांचा अन मुलगी आहे दहा महिन्याची कोणावरच येऊ नये वेळ अशी हे असे दुःख भोगण्याची देशासाठी बलिदान यासारखे दुसरे कार्यच नाही मोठे अश्रूंच्या धारांचा सांगा हिशोब ठेवावा तरी कुठे ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो. 8424043233

Pranali jadhav

 Dear Ajay sir            खरंतर खूप काही लिहावसं वाटतंय तुमच्याबद्दल पण नक्की काय लिहू तेच कळत नाहीये...... मी तुमचा विचार केला तर हेच सुचत मला ❤️ तेरा मुझसे है पहले का नाता कोई युही ही नही दिल लुभाता कोई.....😇माहिती नाही तुमच्या लाईफ मध्ये माझं काय स्थान आहे पण माझ्या छोट्याशा आयुष्यात खूप मोठी जागा आहे तुमची......🤗तुम्ही नेहमीच मला जेव्हा जेव्हा मदत हवी असते तेव्हा तुम्ही मला मदत करता तुम्ही बनवलेले व्हिडिओज मधून of course माझे सर आहेतच helpful.....😍😘        तुम्ही माझे सर आहेतच पण जेव्हा मला गरज असते तेव्हा तुम्ही माझे friend ,best friend, best teacher and all या सगळ्या भूमिकेत तयार असतात..... Really very thank you .....😘 तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून तसेच खूप काही बदल लहान झाले आहे माझ्यात....तुमची प्रत्येक गोष्ट नेहमी काहीतरी शिकवून जाते आणि नेहमी माझ्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटवून जाते.....🙂😊 तुमच्या सगळ्या गोष्टी मला हव्याहव्याशा वाटतात......😍 तुम्ही लांब असूनही माझ्या मनात खूप जवळ आहात...🤗प्रत्यक्षात आपली कधी भे...

अजिंक्य राऊत

इमेज
  * खटाव गावचे सुपुत्र शहीद जवान अजिंक्य राऊत यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐 *             * वीरमरण * वीरमरण आले त्यांना बजावताना देशसेवा असा पुत्र प्रत्येक मातेच्या पोटी जन्मा यावा धन्य झाली तिची कुस डोळ्यात टिपूस ही नसेल देशाच्या कामी आला पुत्र चेहऱ्यावर अभिमान दिसेल देशसेवेसाठीच झिजवली त्याने आयुष्यभर काया शूरवीरांची भूमी ती बलिदान जाईल कसे वाया तिच्या कुंकवाचे जरी पुसले गेले सूर्यबिंब लेकराच्या डोळ्यात पाहीन ती त्याचेच प्रतिबिंब नाव त्याचे अजिंक्य तो अजिंक्यच राहील हृदयात लाखो सूर्य मावळतात एका शूरविराच्या उदयात तिच्या पोटात वाढतोय अंश त्याच्याच रक्ताचा अभिमान बाळगतो आम्ही नेहमी शहीद या तख्ताचा ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

वडापाव दिन

 #जागतिक_वडापाव_दिवस  खमंग सुवास जणू भुरळ घालायचा मनाला खरं खरं सांगा वडा पाव आवडायचा कोणाला वडिलांनी दिलेले पैसे  ठेवायचो आम्ही जपून भूक लागली की वडापाव मग हळूच खायचो लपून वडापावचा स्वाद दिवसभर रेंगाळायचा जिभेवर बहिष्कार टाकावा तरी कसा सांगा मित्रांच्या सभेवर गरमागरम वडापाव सोबत मिरच्या हव्यातच तळलेल्या आठवतात पुन्हा पुन्हा त्या मैत्रीच्या गाठी जुळलेल्या एकटा एकटाच हातात असतो वडापाव धरून कॉलेजचे ते दिवस पुन्हा सांगा येतील का फिरून ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो:- 8424043233

निरोप समारंभ

 *निरोप समारंभ* काय बोलावे ते मला आता काहीच कळत नाही तुमच्या आठवणींचा सूर्य मनाआड का ढळत नाही थोडा आनंदाचा आणि थोडा क्षण हा दुःखाचा इथून पुढचा प्रवास तुमचा नक्कीच होईल सुखाचा तुम्ही सोडून चाललात याचे दुःख नक्कीच आहे मनी मन गहिवरते आमचे अन डोळे पाणावतात या क्षणी तुमच्या विना जिवलग आम्हास इथे दुसरे कोणीच नसे पिटीसीच्या मातीत दिसतील तुमच्या अस्तित्वाचे ठसे भारावलेल्या मनानी आम्ही आज निरोप देतो तुम्हास फक्त हृदयात तुमच्या नेहमी जागा असावी आम्हास ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रत चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी

खाकी वर्दीतील दर्दी कवी..

इमेज