पोस्ट्स

प्रथम पुण्यस्मरण

इमेज
*आपल्या मरोळ PTC येथील महिला प्रशिक्षणार्थीं जोत्स्ना खांडेकर यांच्या पतीच्या प्रथम पुण्यस्मरण*  *दिनानिमित्त मी लिहलेली ही कविता* *नक्कीच आपल्या हृदयास स्पर्शून जाईल.....* *प्रथम पुण्यस्मरण..* आठवणीत आपल्या  असंख्य टिपे गळाली  आपल्यामुळेच तर खरी ही वर्दी मला मिळाली एकटीच गात आहे या आयुष्याचे बेसूर गीत जेव्हा पासून तुम्ही सोडून गेलात सुमित आठवण तुमची मनात अगदी क्षणोक्षणी आहे त्या आठवणीविना सांगा मला दुसरं कोणी आहे तुमच्या माघारी मी जरी मन केले घट्ट तुम्ही परत यावे असा  धरू कोणाजवळ हट्ट कसा घालू तुम्हीच सांगा डोळ्यातील अश्रूंना आवर काही ओळी सुचल्या कशाबशा त्यातही वरून दोन थेंब त्यावर ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी

वाढदिवस लग्नाचा कोरोना

 #प्रिय_पत्नीस..... लग्नबांधनात अडकलो आपण त्यास आज वर्षे झाली बारा आसुसलेल्या जीवास या  तुझ्या कुशीत मिळेना थारा लग्नाचे वाढदिवस कुठे सांग  असतात पोलिसांच्या नशिबी सहवासाचे क्षण तेवढे सखे ठेव तू आपल्या हिशोबी कोरोनामुळे परिस्थिती आज सगळीकडेच आहे गंभीर पोलीस पत्नी आहेस तू मन अजून जरा कर खंबीर सवय झालीच असेल तशी तुला या पोलीस नोकरीची माझ्या हीच खरी कसोटी म्हणत करू लग्नाच्या आठवणी ताज्या वाटण साहजिकच आहे या क्षणी सोबत मी असावे शुभेच्छा स्वीकारत माझ्या नकळत गाली तू हसावे ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण  खाकी वर्दीतील दर्दी कवी मो.8424043233

Khaki varditil dard kavi

इमेज
 

भावपूर्ण श्रद्धांजली सर जी

इमेज
 गडचिरोली येथे कार्यरत असलेले महाराष्ट्राचे एक उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून नावलौकिक मिळविलेले  आदरणीय *साजिद अली खान सर यांना खाकी वर्दीतील दर्दी कवीकडून* *ही शब्दरूपी श्रद्धांजली..💐💐* *भावपूर्ण श्रद्धांजली सर जी* ज्यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलास बसला धक्का साजिद खान सर म्हणजे  मैदानावरील हुकमी एक्का पोलीस पदक राष्ट्रपती पदक पदकांचा वेगळाच साज होता कालपर्यंत होते ते आपल्यात मात्र दुर्दैवी किती आज होता मॅप रिडींगचे होते त्यांना ज्ञान ही  सखोल तितकेच सोडून जाऊ नयेत अशी माणसे बस म्हणणे आहे इतकेच उत्तम प्रशिक्षक म्हणून आज त्यांची महाराष्ट्रभर ख्याती आहे काय सांगू उरात आमच्या आज दुःख साचले किती आहे आसवांनी द्यावी सलामी अन हृदयाचा व्हावा तिरंगा  पुन्हा येतील का परतुन आमचे साजिद सर सांगा ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो. 8424043233

आजोबा

 *आजोबा....* आजोबा आणि नात म्हणजे दिवा आणि वात आपुलकीचा निर्मळ झरा जणू हृदयाच्या आत प्रथम आपले पुण्यस्मरण अन तारीख आजची बारा पुन्हा तुमच्या कुशीत अण्णा या नातवंडांस मिळावा थारा या नात्यातील थोडा वेगळाच असतो गोडवा राग कधीच येत नाही आपण कितीही चिडवा उच्च विचार आणि राहणी असावी साधी हेच तर शिकवलं ना तुम्ही  आम्हा सोडून जाण्याआधी सामाजिक राजकीय क्षेत्रात आपण उमटवला वेगळाच ठसा काहीं केलं तरी पुन्हा आता नेता होणार नाही असा कोणाचं व्यक्तिमत्त्व हे असंच नसतं ठरतं रिकाम्या हाती कधीच कुणी इथून गेला नाही परत तुमच्या आठवणींनी आज प्रत्येक हृदयास फुटेल पाझर मनास सारखे वाटत राहते आपण आमच्यात असता जर अंगाखांद्यावरच झालो तुमच्या आम्ही लहानाचे मोठे आठवण आपली प्रत्येक क्षणी आपणास आता शोधावे कुठे न्यायानेच वागलात आपण  आणि न्यायासाठीच लढला दोन घास खाऊन जा अण्णा नातवंडांनी पान जो वाढला ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी

Hc देविदास केरकळ

 सर खरेतर आपले नाव मी खूप ऐकले होते परंतु आज दैवयोगाने भेट झाली खूप खूप आनंद झाला तसे पाहिले तर आपणाला पाहून असे वाटले यांना मी रोज कुठेतरी पाहतोय क्षणात तुमची नेमप्लेट पाहिली आणि नाव वाचल्यावर लगेच तोंडातून शब्द बाहेर पडले खाकी वर्दीतील दर्दी कवी आपणच का??. .  आणि आपले उत्तर आले हो खरंच सर आपल्याला पाहून खूप प्राऊड फील झाले कारण सोशल मीडियावर 👌🏻आपल्या कविता खूप वेळा वाचल्या तेव्हापासून मनात इच्छा होती हे कवी कुठे भेटतील आणि आज साक्षात आपली भेट झाली😘😘😘😘😘😘😘

शहीद जवान सोमनाथ मांढरे

इमेज
  * साताराः * वाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांना लडाख येथे देशसेवा बजावताना वीरमरण आले. त्यांच्या पवित्र स्मृतींना खाकी वर्दीतील दर्दी कवीची ही शब्दरूपी श्रद्धांजली.... 💐💐💐💐💐💐💐 * शहीद जवान सोमनाथ मांढरे * दुःखात अखंड बुडाले काल छोटेसे गाव सगळे आसले देशासाठी शहीद झाले ते अजून मरण हवे तरी कसले त्यांच्या जाण्याने हळहळले संपूर्ण सातारा अन वाई धूमसून धुमसून रडत असेल त्या गोंडस लेकरांची आई एका क्षणात होऊन गेले कपाळ तिचे पांढरे अनंतात विलीन झाले जवान सोमनाथ मांढरे मुलगा आठ वर्षांचा अन मुलगी आहे दहा महिन्याची कोणावरच येऊ नये वेळ अशी हे असे दुःख भोगण्याची देशासाठी बलिदान यासारखे दुसरे कार्यच नाही मोठे अश्रूंच्या धारांचा सांगा हिशोब ठेवावा तरी कुठे ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो. 8424043233