पोस्ट्स

जनता

 *जनता....* संपली निवडणूक उधळला गुलाल जिंकणाऱ्यांची चांदी हरणाऱ्यांचे हाल अंदाज सगळेच ठरले फोल कुणाची सरशी तर कुणाला कौल प्रचाराची रणधुमाळी आश्वासानांची खैरात फोडाफोडीच्या गोंधळात जनता झाली सैराट पक्षांची फोडाफोड चिन्हाची पळवापळवी सत्तेच्या लालसेपोटी  मताची जुळवाजूळवी कोणाची प्रतिष्ठा पणाला तर कोणाचा स्वाभिमान गहाण लोकशाही राज्यात शेवटी जनता हीच महान ✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो:- 8424043233

नातं भावा भावाचं

 *नातं भावा-भावाचं....* हसत हसत द्यायचा तो अगदी घासतला पण घास असा कसा उडाला मग एकमेकांवरचा विश्वास लहानपणी भावासाठी जो आयुष्य आला हरत एकमेकांची डोकी फोडायलाही  ते कमी नाही करत त्यालाच होती काळजी कधी  भावाच्या फाटक्या शर्टाची  तोच चढतो इस्टेटीसाठी शेवटी पायरी कोर्टाची निरागस त्यांच्या डोळ्यात प्रतिशोधाची पेटते आग सगळं संपून गेल्यावरच मग  दोघांनाही येते जाग नातं रक्ताचं असूनही ते एकमेकांचं रक्त शोषतात  तुम्हीच सांगा भावाभावांची नाती  अशी थोडीच असतात  जन्म घेऊन देखील एकाच आईच्या पोटी आयुष्यभर कोरी राहते त्यांच्या आपुलकीची पाटी मदतीला धावणारा तो मयतीला सुद्धा जात नाही म्हणून म्हणतो आयुष्य कुणाचं कुणावचून ही राहत नाही ✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी Mo:- 8424043233

संधी

 सकाळी सकाळी सुचलेली ही वेगळ्या धटणीची कविता नक्कीच आपणास आवडेल मित्रांनो..... *संधी.....* संधी ही संधी असते नशीबाने परिस्थितीला लावलेली आशेची संचारबंदी असते संधी ही संधी असते महादेवाच्या मंदिरासमोरील  शांत सय्यमी नंदी असते संधी ही संधी असते जिभेवर रेंगाळणारी लग्नातील गोड अशी बुंदी असते संधी ही संधी असते यशाच्या वाटेवर  स्वप्नांची मंदी असते संधी ही संधी असते योग्य वेळी मिळाली की आयुष्याची चांदी असते संधी ही संधी असते कष्टाच्या मखमलीखाली  जिद्दीची फांदी असते संधी ही संधी असते हुकली की उध्वस्त साधली की जबरदस्त असते ✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी Mo:- 8424043233

उभरती पाखरे

इमेज
आभाळ मुक्त झालं आज  उभरत्या पाखरांना मुक्त हस्ताने गवसनी घाला तुम्ही उत्तुंग शिखरांना शहाणपणाच्या दुनियेत हे  पाऊल तुमचं पहिलं एक टप्पा तर पार केला  आता बाकी काय राहिलं  नव्याने प्रयत्न करताना ही दुनिया तुमच्यावर हसल जिद्दीच्या जोरावर आई वडिलांचे तुम्ही नाव करा रोशन येणाऱ्या अडचणीवर मात करा ध्येर्याने दाही दिशा उजळूद्या  तुमच्या अलौकिक शोर्याने तुमच्या निरागस डोळ्यात  गोंडस स्वप्न त्यांचं फुलूदे तुमच्या यशाच्या झोपाळ्यावर मनसोक्त त्यांना झूलूदे एक मात्र तुम्ही  पक्क स्वतःशी ठरवा खच्ची होणाऱ्या मनाला आत्मविश्वासाने हरवा संघर्षाच्या मैदानात संकटाशी नजर भिडवा  बघतच राहतील ते तुम्ही इतिहास असा घडवा ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो :- 8424043233

पोलिसांची दिवाळी*

 *पोलिसांची दिवाळी* ऐन दिवाळीच्या मोक्यावर निवडणुकीच बिगुल वाजलं  स्वप्न सारं मनातलं त्याच्या  असं अश्रूमध्ये भिजलं कुटुंबांसोबत चार घास त्याने खाल्ले असते गोड धोड पण कर्तव्यापुढे कसली आली म्हणा दिवाळीची ओढ सुगंधी उटण्याने त्यानेही  केले असते शाही स्नान अरे या वर्दीमुळेच तर त्याला समाजात मिळतो मान  पंचारतीने तिने त्याला  ओवाळले असते आवडीने पण सण उत्सव पोलिसांना  मिळतात कुठे सवडीने कुंकवाचा लाल टिळा तिने लावला असता त्याच्या माथी त्याग समर्पन बलिदान हीच खरी पोलिसांची ख्याती आनंदाने  घर सारं  त्याचं गेलं असतं न्हाऊन दुसऱ्यांच्या आनंदात आनंद  त्यांच्या जगण्यात घेतो जगून त्यांच्यामुळेच दिवाळी आपली  जर का होतं असेल गोड धोड खरच पोलिसांच्या त्यागाला या जगात नाही तोड ✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो:- 8424043233

जी होती मनात...

*जी होती मनात..* जी मनात होती मित्रांनो  नेमकी तीच नाही मिळाली माझी साधी भोळी प्रीत तिला कधीच नाही कळाली तीच मनमोहक रूप डोळ्यांना घालायचं भुरळ ती अल्लड नखरेवाली माझा स्वभाव मात्र सरळ डोळ्यात साठवायचो रोज तीचं देखणं रूप जिवापेक्षा ही जास्त ती आवडतं होती खूप ती मिळावी म्हणून मी काय काय नाही केलं आयत्या वेळी मात्र होत्याचं नव्हतं झालं मनात असूनही ती दुसरी सोबत संसार थाटला तुम्हीच सांगा मित्रांनो तुम्हाला दर्दी कवी खरच असा वाटला  काळेकुट्ट केस तिचे अन लाल तिची साडी होती  दुसरं तिसरं कोणी नाही मित्रांनो  मला आवडलेली ती एक गाडी होती ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक  अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो:- 8424043233

तिला आवडते...

 मित्रांनो आज जवळजवळ खूप दिवसातून मघाशी बसल्या बसल्या  नवीन काहीतरी सुचलं नक्कीच आवडेल ही कविता तुम्हांला.... 👍 *तिला आवडते* तिला आवडते पेरूची फोड मला मात्र तिचा स्वभाव गोड तिला आवडते पुरणाची पोळी मला मात्र तिची  राहणी साधी भोळी तिला आवडते पावसाची सर मन मात्र म्हणत तिच्यावरच मर तिला आवडतो पाकातील गुलाबजाम मला मात्र तीचे सुगरण काम तिला आवडतं  मनमोकळं जगायला आणि मला मात्र तिला आनंदी बघायला तिला आवडतात फुलपाखरांचे रंग मी मात्र  वेडा  तिच्या आठवणीत दंग तीला आवडतो गोड दहिभात मला मात्र राहायचंय  तिच्या हृदयाच्या आत ✍️✍️✍️✍️✍️✍️ पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो:- 8424043233