पोस्ट्स

सप्टेंबर, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फुले की मुले

इमेज
फुले की मुले आपल्याही संसारात आता उमलावीत दोन नाजूक फुले फुलसारखीच असावीत दोन गोजिरवाणी मुले एक असावं गुलाबाचं आणि एक असावं जाईचं मिळाली नाही बहिणीची माया पण आगमन व्हावं ताईचं उमटावीत घरात आपल्या आता चीमुकली ची गोंडस पावले मन फक्त त्या एका वेड्या आशेमागे धावले थोडी तुझ्यासारखी थोडी माझ्यासारखी असावी ती पाहता क्षणीच नजरेत आपल्या बसावी ती कधी होईल पूर्ण इच्छा अंगाखांद्यावर खेळवण्याची तिला जशी अवगत झाली कला अक्षर जुळवण्याची मला अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233

धो धो पडतो पाऊस

इमेज
*धो धो पडतो पाऊस*  धो धो पडतो पाऊस पावसात नको जाऊस आई म्हणते बाळाला जायचंय उद्या शाळेला भिजलास तू या पावसात तर आजारी पडशील या दिवसात घरात गेली आई मुलांनी केली घाई पावसात गेली मुले ओली झाली मुले खूप खूप नाचली आईची नजर पोचली आईने दिला मार मुले रुसली फार मग जवळ घेऊन आईने लाडू दिले चार मग मुलांचा गेला रुसवा साऱ्या मुलांना हसवा अजय द चव्हाण उर्फ राहुल खाकी वर्दीतील दर्दी कवी मोबाइल नंबर  8424043233

घायाळ हरिणी

इमेज
तिच्या मनीचे दुःख माझ्या लेखणीतून *ओढ* घायाळ मी हरिणी म्हणे चित्कारुनी जीव हा क्षिणला श्वास हा कोंदला भेटीवीन आता व्याकुळ भावना  शब्द फुटेना दिस हे कटेना आस ती वाटेना जगण्या आता तुजला प्रेमाची आन माझी ही अवस्था जान नाही या कंठात प्राण सोबती तू हेच दान दे ईश्वरा आता हवा तुझा सहवास नको हा वनवास काय सांगू जीवास तूच मला हवास कसाही आता हृदय हे धडधडते पापणी ती फडफडते काळीज थरथरते मन ही धडपडते  भेटीसाठी आता अजय दत्तात्रय चव्हाण उर्फ राहुल  खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233