धो धो पडतो पाऊस
*धो धो पडतो पाऊस*
धो धो पडतो पाऊस
पावसात नको जाऊस
आई म्हणते बाळाला
जायचंय उद्या शाळेला
भिजलास तू या पावसात तर
आजारी पडशील या दिवसात
घरात गेली आई
मुलांनी केली घाई
पावसात गेली मुले
ओली झाली मुले
खूप खूप नाचली
आईची नजर पोचली
आईने दिला मार
मुले रुसली फार
मग जवळ घेऊन आईने
लाडू दिले चार
मग मुलांचा गेला रुसवा
साऱ्या मुलांना हसवा
अजय द चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मोबाइल नंबर
8424043233
टिप्पण्या
खरच लहानपणीची आठवण आली