
🇮🇳🙏 वीर मरण 🙏🇮🇳 चटका लावून गेले जीवाला त्यांचे वीरमरण शतजन्म त्यांचे आपण पुजीत राहवे चरण...॥॥ देशभक्ती नसानसात भीनलेली शत्रुशी लढताना ही मातृभूमी ही भारावली प्राण त्यांनी सोडताना..॥ मातृभूमीला वाहिले त्यांनी आपल्या देहाचे तोरण....... चटका लावून गेले जीवाला त्यांचे वीरमरण॥ दुष्मनांची केली राख होऊंन त्यांनी आग श्रेष्ठ त्यांचे बलिदान श्रेष्ठ त्यांचा त्याग॥ शौर्य त्यांचे असे दुश्मन ही आले शरण...... चटका लावून गेले जीवाला त्यांचे वीरमरण ...