*अंगाई*

आई गाते अंगाई
सारे विसरून जाई

चंद्र लपला ढगात
आई सांगते कानात
नाही केलास अभ्यास तर
बाई मारतील वर्गात

आई सांगते ताईला
बाळ माझा हुशार
करील अभ्यास सारा
कसा खाईन मार

चंद्र तारे येती
स्वप्न मुलांना देती
घेवुनी गोड पापा
आई कुशीत घेती

मुले आवडती साऱ्यांना
चमचमणाऱ्या ताऱ्यांना..


अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत