पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कल्पना सागरात शब्दासवे....

इमेज
 

पावन झाले करवीर......

इमेज
 

भूलना आदत नहीं हमारी..…

इमेज
 

फक्त प्रेम मिळवता आलं पाहिजे.....

इमेज
 

खरंच का ते.......

इमेज
 

जशास तसे वागले ना की.......

इमेज
 

Happy Birthday Aarti.....

इमेज
  *🎊🎉Happy Birthday Aarti🎊🎉* हृदयातील ठोका आहेस की आहेस श्वासातील श्वास हा एकच दिवस सखे असतो माझ्यासाठी खास तुझ्या चिमुकल्या पावलांनी आज स्पर्श केलास धरतीस काहीच कमी पडून देणार नाही कधीच या आरतीस आनंदात सामील करून घेऊ आपण आपल्या लेकरा शुभेच्छांच्या सुगंधाने भारूदे  आज एकोणीस अकरा अजय आरती अनुज अनुष्का संसाराची ही अभेद्य चौकट पोलिसाची पत्नी आहेस तू  जन्म जाईन कसा फुकट कळलंच नाही वयाची कधी वर्ष पूर्ण झाली बत्तीस प्रत्येक सुखदुःखात खंबीरपणे तूच तर उभी होतीस अशी कोणती भेट देऊ तुला या जगातील अनमोल तुझ्या सहवासानेच धडकतात दर्दी कवीच्या स्पंदनांचे ढोल ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी

भाऊबीज......

इमेज
 *भाऊबीज* भावाने बहिणीची  करावी रक्षा जशी आयुष्यभराची घेतलेली दिक्षा बहिणीने भावाला  पंचारतीने ओवाळावे जगातील सारे सुख ताईला मिळावे भावाने बहिणीचे  करावेत खूप लाड भाऊ म्हणजे जणू एक आनंदाचे झाड भावाने बहिणीला काटा टोचू देऊ नये दुःखाची फुले कधी तिला वेचू देऊ नये भावाने बहिणीसाठी शोधावे सुंदर घर जिथं प्रेम देणारी माणसे असतील आयुष्यभर भावाच्या भाळी बहिणीने लावावा केशरी गंध पवित्र असे ते जन्मोजन्मीचे बंध ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो:- 8424043233

बालदिन.....

इमेज
 *चाचा नेहरू* लहान मुलांच्या आनंदाला  हळूच येते उधाण असे होऊन गेले एक भारताचे पंतप्रधान चाचाजी चाचाजी त्यांना आवडीने म्हणायची मुले तितकीच प्रिय होती त्यांना गुलाबाची ही फुले प्रत्येक भारतीयास अभिमान आहे ज्यांचा बालदिन म्हणून साजरा होतो जन्मदिवस त्यांचा भारताच्या स्वातंत्र्यात ही त्यांनी दिले आपले योगदान असे होऊन गेले नेहरू  भारताचे पहिले पंतप्रधान असे होते चाचा नेहरू लहान मुलांचे लाडके  त्यांच्यामुळेच तिरंगा हा अगदी डौलाने फडके ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी

शिकवण आजीची......

इमेज
                           *शिकवण आजीची* असंच आजीने शिकवलं शरीर संपदा जप त्याशिवाय देहाला  नाही कुठं खप शरीर संपदा चांगली तर तुला हवं ते मिळेल या दुनियेची रीत तुला जवळून कळेल कधी शिकवल्या तिनं  चार गोष्टी ज्ञानाच्या सांगितल्या तिनं वेदना दुःखी कष्टी मनाच्या स्पर्शानेच ओळखायची ती डोळ्यांनी दिसत नव्हतं तरी कुरवाळून घ्यायची जवळ बरसायच्या मायेच्याच सरी कधी घरी गेलो की  आवडीने पापे घेते जगणे अवघड असले तरी आणखीनच सोपे होते जवळ जाऊन बसलो की आनंद तिचा ओसंडून वाहतो पुण्याई तिची खूप थोर मनास चरणी सांडून पाहतो ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो :-8424043233