शिकवण आजीची......
*शिकवण आजीची*
असंच आजीने शिकवलं
शरीर संपदा जप
त्याशिवाय देहाला
नाही कुठं खप
शरीर संपदा चांगली तर
तुला हवं ते मिळेल
या दुनियेची रीत तुला
जवळून कळेल
कधी शिकवल्या तिनं
चार गोष्टी ज्ञानाच्या
सांगितल्या तिनं वेदना
दुःखी कष्टी मनाच्या
स्पर्शानेच ओळखायची ती
डोळ्यांनी दिसत नव्हतं तरी
कुरवाळून घ्यायची जवळ
बरसायच्या मायेच्याच सरी
कधी घरी गेलो की
आवडीने पापे घेते
जगणे अवघड असले तरी
आणखीनच सोपे होते
जवळ जाऊन बसलो की
आनंद तिचा ओसंडून वाहतो
पुण्याई तिची खूप थोर
मनास चरणी सांडून पाहतो
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो :-8424043233
टिप्पण्या