काही दिवसापासून मी एक सुविचार वाचतोय की, *कधी कोणत्याही गोष्टीचा* *अहंकार करू नये कारण मोराला सुद्धा त्याच्या पंखाच्या वजनामुळे उडता येत नाही* पण मला हेच कळत नाही की, मोराला त्याच्या पंखाचा अहंकार झाला हे सांगितलं कुणी त्यावरूनच सुचलेली ही सुरेख कविता रसिक मित्रांनो नक्कीच आवडेल आपणास... 👍 *उगाचच काहीही* त्याच्या पंखाच्या वजनामुळे म्हणे त्याला येत नाही उडता त्याचा देखणेपणा पहा त्यात उणीव कुठे काढता राष्ट्रीय पक्षी आहे तो त्यास इतिहास आहे साक्षी जगात दुसरा कोणी नाही त्याच्यासारखा सुरेख पक्षी पाऊस आला की तो अगदी भान हरपून नाचतो त्यात उणीव काढण्याचा उद्योग लोकांस कसा काय सुचतो मला हेच कळत नाही लोकांना चांगुलपण का नाही पचत स्वतः देव देखील मोरपीस होते ना डोक्यात खोचत त्याचं रुबाबदार दिसणं भुरळ पाडते मनाला अशी उगाचच नावे कशाला ठेवावीत कुणाला सुविचार काहीही बनवतात मात्र काहीच नसतं माहित अजूनही आहे तसंच असेल ते पहा प्रेमी युगलांच्या वहीत ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ PSI अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो :- 8424043233
पोस्ट्स
सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
पोलीस पत्नी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

*पोलीस पत्नी* विसरता कसा येईल पोलीस पत्नीचा त्याग ती देखील आहे या वर्दीचाच एक भाग तो तरी कुठे असतो म्हणा कुठल्या सणासुदीला घरी तिच्या संयमाचीच ती सत्वपरीक्षा असते खरी ती ही खूप जिद्दी असते कधीच मानत नाही हार कुटूंबाची जबाबदारी ती अगदी धैर्याने पाडते पार करावं तेवढं कमीच आहे तिच्या संघर्षाचं कौतुक तिच्या नशिबी नसतंच शक्यतो आपल्या पोलीस पतीचं सुख बंदोबस्तात त्याचा चेहरा तिच्यामुळेच तर असतो हसरा तो घरी येईल तोच दिवस तिच्यासाठी दिवाळी दसरा ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️ PSI अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी मो :-8424043233