पोलीस पत्नी


 *पोलीस पत्नी*


विसरता कसा येईल

पोलीस पत्नीचा त्याग

ती देखील आहे या

वर्दीचाच एक भाग


तो तरी कुठे असतो म्हणा 

कुठल्या सणासुदीला घरी 

तिच्या संयमाचीच ती

सत्वपरीक्षा असते खरी


ती ही खूप जिद्दी असते

कधीच मानत नाही हार 

कुटूंबाची जबाबदारी ती 

अगदी धैर्याने पाडते पार


करावं तेवढं कमीच आहे

तिच्या संघर्षाचं कौतुक

तिच्या नशिबी नसतंच शक्यतो 

आपल्या पोलीस पतीचं सुख


बंदोबस्तात त्याचा चेहरा

तिच्यामुळेच तर असतो हसरा 

तो घरी येईल तोच दिवस

तिच्यासाठी दिवाळी दसरा

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

PSI अजय दत्तात्रय चव्हाण

खाकी वर्दीतील दर्दी कवी

मो :-8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत