Happy Birthday Anuj



गहिवरतो हा बाप तुझा 


तुझ्या वाढदिवसाला मी
येऊ शकत नाही रे बाळा
तुझी प्रत्येक आठवण जीवाला 
लावून जाते लळा

आज 15 जून आणि
वाढदिवस तुझा सातवा
तूच माझा लाडला अन
तूच माझा मितवा

तुला घेऊन खांद्यावर अनुज
खूप नाचावसं वाटतं
तुझ्या विरहाच दुःख
नयनात तसंच आटतं


तुझ्या वाढदिवसाचे क्षण 
डोळ्यासमोरच नाचतात
नाही मी तिथे या वेदना 
बापाच्या हृदयी बोचतात 

तुझा प्रत्येक हट्ट मी
 जिवापल्याड पुरवावा 
तुझा उज्वल भविष्यकाळ
असा आनंदाने सारवावा

आणखी काय देऊ तुला
अनुज  मी शुभेच्छा
गहिवरतो हा बाप तुझा 
मनातून  सच्चा





सातव्या वाढदिवसाच्या तुला खुप खुप शुभेच्छा


अजय दत्तात्रय  चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या गुलाबाच्या फुला

जी होती मनात...

🇮🇳 वीर जवान तुम्हे सलाम 🇮🇳