उतराई

🤔उतराई✍


काहीच उरले नाही 

ज्यावेळी आली संधी

अशीच उतरली सारी

डोळ्यावरची धुंदी।।


धुंदीतच होतो मी

स्वप्ने होतील साकार

मात्र जी केलि मेहनत

गेली सारी बेकार।।


जे लिहले होते मी

जिव सारा ओतून

मी मात्र पूरता

जळत राहिलो आतून।।


सवयच होती मला 

आतून जळण्याची

अश्रु गळू न देता 

हूंदका गिळण्याची।।😪


हूंदका गिळूनच तर

 झालो मी कवी

या ईश्वरी कृपेची

उतराई कशी व्हावी।।🙏�

        

         अजय द. चव्हाण

          उर्फ़ राहुल

         खाकी वर्दीतील दर्दी कवी  

           8424043233📝

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या गुलाबाच्या फुला

जी होती मनात...

🇮🇳 वीर जवान तुम्हे सलाम 🇮🇳