आईच्या मखमली हृदयातून पाझरलेले शब्दामृत
माझ्या गुलाबाच्या फुला
माझ्या गुलाबाच्या फुला किती लावशील जिव मला।। किती त्रास सहन करशील माझ्या जपन्या मनाला आठवनिविना लवत नाहीत तुझ्या पापण्या क्षणाला ।। माझ काही दुखल तर वेदना होतात तुला सार लक्ष माझ्याकडे झोप नसते तुला।। इतकी का आतुर होतेस कधी एकदा मला भेटाव अस शांत झोपुन राहव अन तुम्ही आल्यावरच उठाव्।। इतका का जीव लावते मला जशी आई बाळाला लावते सर्वस्व वाहिलस मला जशी वात ज्योतिला वहाते।। अजय द. चव्हाण ( उर्फ़ राहुल) खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233
टिप्पण्या