व्यथा जवानांची



*व्यथा जवानांची*

याच्या भावना झाल्या अनावर
नुसतं हिसक्या मारतय जनावर
जोपर्यंत नाही येत बदली
तोपर्यंत नाही येणार भानावर

हंबरडा फोडतंय मन
ओरडून ओरडून सांगतंय
माझं दावं सोडा एकदा
नुसतं गुरकावून बघतय

भावना दाबून मनात
बसलंय माती उकरीत
कधी एकदा बदली येतेय
आता या नोकरीत

या जनावरास ही आता
मायेचा पान्हा फुटलाय
एक एक दिवस मोजणं
अक्षम्य गुन्हा वाटलाय...

✍✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो.8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या गुलाबाच्या फुला

कवी कलश

उनाडपणा