बालदिन.....
*चाचा नेहरू*
लहान मुलांच्या आनंदाला
हळूच येते उधाण
असे होऊन गेले एक
भारताचे पंतप्रधान
चाचाजी चाचाजी त्यांना
आवडीने म्हणायची मुले
तितकीच प्रिय होती त्यांना
गुलाबाची ही फुले
प्रत्येक भारतीयास
अभिमान आहे ज्यांचा
बालदिन म्हणून साजरा होतो
जन्मदिवस त्यांचा
भारताच्या स्वातंत्र्यात ही
त्यांनी दिले आपले योगदान
असे होऊन गेले नेहरू
भारताचे पहिले पंतप्रधान
असे होते चाचा नेहरू
लहान मुलांचे लाडके
त्यांच्यामुळेच तिरंगा हा
अगदी डौलाने फडके
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी

टिप्पण्या