कर्ज म्हटलं की
कर्ज म्हटलं की.......
कर्ज म्हटलं की
अंगावर येतो काटा
रक्ताळलेल्या अश्रूंच्या
कोसोदूर वाटा
राबराब राबल तरी
मनासारखं पिकत नाही
कर्जाच पारडं इतकं जड
काही केल्या झुकत नाही
कधी कडक उन्हाळा
तर कधी पाऊस होतो जास्त
जगणं होत महाग
मरण मात्र स्वस्त
कर्ज असलं की माणूस
होऊन जातो लाचार
दुःख भरल्या मनाचा
करतो कोण विचार
कर्ज डोक्यावर म्हटलं की
लागत नाही झोप
उमेद संपते जगण्याची अन
गळ्याभोवती रोप
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
टिप्पण्या