संधी
सकाळी सकाळी सुचलेली ही
वेगळ्या धटणीची कविता
नक्कीच आपणास आवडेल मित्रांनो.....
*संधी.....*
संधी ही संधी असते
नशीबाने परिस्थितीला लावलेली
आशेची संचारबंदी असते
संधी ही संधी असते
महादेवाच्या मंदिरासमोरील
शांत सय्यमी नंदी असते
संधी ही संधी असते
जिभेवर रेंगाळणारी लग्नातील
गोड अशी बुंदी असते
संधी ही संधी असते
यशाच्या वाटेवर
स्वप्नांची मंदी असते
संधी ही संधी असते
योग्य वेळी मिळाली की
आयुष्याची चांदी असते
संधी ही संधी असते
कष्टाच्या मखमलीखाली
जिद्दीची फांदी असते
संधी ही संधी असते
हुकली की उध्वस्त
साधली की जबरदस्त असते
✍️✍️✍️✍️✍️
पोलीस उपनिरीक्षक
अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
Mo:- 8424043233
टिप्पण्या