मैत्री म्हणजे
* मैत्री म्हणजे *
मैत्री म्हणजे....
सुखाचा सागर
ओतप्रोत भरलेली
प्रेमाची घागर
मैत्री म्हणजे....
आपुलकीचा झरा
मनोकामना पूर्ण करणारा
तुटता तारा
मैत्री म्हणजे.....
आठवणींचा पाझर
अंगावर झेललेली
पावसाची पहिली सर
मैत्री म्हणजे....
हृदयातील धडधड
पालवी फुटण्याआधीची
पानांची पडझड
मैत्री म्हणजे.....
हळुवार उमलणार फुल
आनंदाची बरसात अन
दुःखाला हूल
मैत्री म्हणजे.....
उंच उडणारा पक्षी
ईश्वराने काढलेली
सुंदर नक्षी
मैत्री म्हणजे.....
सकाळचं कोवळं ऊन
प्रत्येकाने गुणगुणावी
अशी आवडती धून
मैत्री म्हणजे.....
स्फूर्ती देणार काव्य
निसर्गाच्या पोकळीतील
धगधगत दिव्य
मैत्री म्हणजे....
मतभेद भरडणार
दगडाच जात
हृदयातून उपजलेलं
रक्ताचं नातं
मैत्री म्हणजे......
आकाशातील इंद्रधनुच रंगण
जीवाला जीव देत
एकमेकांसाठी जगणं
मैत्री म्हणजे......
न टोचनारा काटा
दुखावलेल्या मनातील
अश्रूंच्या वाटा
मैत्री म्हणजे.....
निभावली तर खूप काही
नाहीतर काहीच नाही
👌👌👌👌👌👌👌
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतला दर्दी कवी
8424043233
👬👬👬👬👬
टिप्पण्या