माझी आई...
माझी आई
(लक्ष्मी)
आई फक्त एकच
तू मला सांग
तुझ्या कष्टाचे ग आई
कसे फिटतील पांग
दिवस रात्र कष्ट करून
थकला तुझा देह
कधीच तुला वाटला नाही
श्रीमंतीचा मोह
काडी काडी जमवून तू
संसार केलास उभा
कष्ट तुझे माहित त्या
निळ्याशार नभा
शरीर थकलं तुझं
कष्ट हि होईना
तुझ्या डोळ्यातील अश्रू
माझ्या हृदयात माइना
काळ्या मातीच्या गाभाऱ्यातून
सोन पिकवलस तू
मोलमजुरी करून
परिस्थितीला झुकवलस तू
काळ्या मातीत झिरपल्या
तुझ्या असंख्य घामाच्या धारा
तुझ्या हृदयात अनुभवला मी
मायेचा प्रेमळ झरा
तुझ्या सोबत शेतात राबण्याचा
वेगळाच आहे हर्ष
नकळत लाभतो मला
तुझ्या सहवासाचा परिसस्पर्श
तुझी सेवा करूनच आई
होईल मी धन्य
जन्मोजन्मी तुझ्याच पोटी
आई घ्यावा मी जन्म
✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
मो. 8424043233
टिप्पण्या