बाप
बाप
आईचे तर सर्वच
गात असतात गोडवे
बाप नावाचं कोडे
सांगा कोण सोडवे
घरातील कर्ता धरता तो
कुटुंबाचा आधार असतो
आई जीवनाचा गाभा तर
बाप जीवनाचा सार असतो
आपल्याला काही झालं
तर त्याचंच हृदय चिरत
बाप नावाचं कोड उलगडायला
अख्ख आयुष्य सरत
स्वतः घेऊन पोटाला चिमटे
कुटुंबाचे भरतो पोट
कष्ट करतो घाम गळतो
सुकतो त्याचा ओठ
आपले सर्व लाड खरतर
बापच पुरवत असतो
आपण जिंकलो आयुष्याच्या शर्यतीत तर
तोच तर मिरवत असतो
पोरीच्या लग्नाची व मुलाच्या नोकरीची
त्यालाच असते चिंता
कर्जाच्या ढिघार्याखाली होतो
आयुष्याचा गुंता
आपली अधुरी स्वप्ने तो
पाहतो मुलांच्या डोळ्यात
लहान लेकरासारखा सामील होतो
तो या आनंदाच्या सोहळ्यात
कीतीही संकटे आली तरी
तो कधीच डळमळत नाही
आई कळते हो आपल्याला
पण बाप कळत नाही
आयुषयाची लढाई जिंकण्यासाठी
तोच तर नेतो पैलतीरी नाव
का कुणास ठाऊक उमजत नाही
हा बाप नावाचा गाव
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
टिप्पण्या