असाच बहुतेक घडतो कवी
असाच बहुतेक घडतो कवी
ठेच लागूनी वेदनांची
असेच बहुतेक चिरते मन
काच लागुनी भावनांची
दुःखाच्या अंगारावरती
चालूनी पाय पोळतात
अश्याच वेळी मनात
असंख्य विचार घोळतात
असाच बहुतेक घडतो कवी
नवविचारांची झालर लेऊनी
ठसा उमटवूनी जातो
हृदयात गीत ठेवुनी
असाच बहुतेक घडतो कवी
देऊनी अग्निपरीक्षा
जळताना शब्दचितेवरती
भाळी लावावी काव्यरक्षा
अग्नीत होरपळून जसे
पोलादाचे होते शस्त्र
परस्थितीत होरपळून तसे
काव्य कवीचे बनते अस्त्र
काव्य कवीचे बनते अस्त्र
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
टिप्पण्या