वारी पंढरीची
*वारी पंढरीची *
शब्दांनीच तर शिकवलं मला
जीवनाचं संगीत
आवडीनं गावं असं
एक सुरेल गीत
शब्दांशीच जुळलं आहे
एक आपुलकीच नातं
त्यांच्या भोवती सारखं
मन घिरट्या घेतं
एकलेपणात खरतर
त्यांनीच दिली साथ
दिवा तेवत ठेवला आनंदाचा
पेटवून स्वतःची देहवात
जेव्हा पुसट होत गेल्या
तिच्या सहवासाच्या रेषा
त्यांनीच शिकवली अश्रूंना
कवितेची सुंदर भाषा
उदास क्षणांचे त्यांनीच तर केले
नभीचे चमचमते तारे
दुःखाच्या कारंजीतून
आनंदाचे फवारे
ही शब्दांची दुनिया मला
खूपच न्यारी वाटते
आनंदाने सामील व्हावी अशी
अशी पंढरीची वारी वाटते
आनंदाने सामील व्हावी अशी
अशी पंढरीची वारी वाटते
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
टिप्पण्या