उसवलेल्या नात्यांचे धागे



उसवलेल्या नात्यांचे धागे

घरट्यातून उडून पिल्लू 
आज खूप आलंय दूर
पण अजूनही गवसला नाही मला
या जगण्याचा सूर

बळ दिलत पंखात तुम्ही

गगनभरारी घेण्यास 
पण पिल्लू ताडफडतय ना
पुन्हा घरट्यात येण्यास

आई तुझ्या कुशीत फक्त

एकदा मला निजूदे 
तुझ्या मायेच्या पावसात
ओलचिंब भिजुदे

बापू तुम्ही पुन्हा एकदा 

माझ्यावर ओरडा
माझ्या उज्वल भविष्यासाठीच
घसा केलंत ना कोरडा

आजीच्या ओव्या आणि गोष्टीने

तृप्त व्हायचे कान
आता कसं सून सून आहे
हे आनंदाचे रान

तू आवडीने मला जेव्हा

 म्हणायचास आबा
आपल्या भावा भावाच्या
नात्याचा गूढ होता गाभा

"आजोबा" हा फक्त 

शब्दच पडला कानावर 
बहिणीच्या नसण्याची अजून
खंत आहे मनावर

क्षण निघून जातात आणि

आठवणी राहतात मागे
सांगा ना कसे सांधावेत हे
उसवलेले नात्यांचे धागे

 अजय दत्तात्रय चव्हाण

 उर्फ (राहुल)
  *खाकी वर्दीतला दर्दी कवी*
मो.8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत