घायाळ हरिणी
*ओढ*
घायाळ मी हरिणी
म्हणे चित्कारुनी
जीव हा क्षिणला
श्वास हा कोंदला
भेटीवीन आता
व्याकुळ भावना
शब्द फुटेना
दिस हे कटेना
आस ती वाटेना
जगण्या आता
तुजला प्रेमाची आन
माझी ही अवस्था जान
नाही या कंठात प्राण
सोबती तू हेच दान
दे ईश्वरा आता
हवा तुझा सहवास
नको हा वनवास
काय सांगू जीवास
तूच मला हवास
कसाही आता
हृदय हे धडधडते
पापणी ती फडफडते
काळीज थरथरते
मन ही धडपडते
भेटीसाठी आता
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
टिप्पण्या