
मुंबईत गर्दी दाट गोळीबार सुसाट भीतीची वाट मारणाशी गाठ CST त आत .........पडली तयांची पळवून पोलिसांची गाडी अंदाधुंद गोळी झाडी थांबता स्कॉडा गाडी मृत्यूची बेडी ........ न चुकली तयांना माणुसकीचा घात वैऱ्याची रात ताज ,ओबेरॉय यात दहशतवादी आत .......लपले भयांनी Ak56 व 47 चा फायर कित्येक घायल ग्रीनेड चे स्फोट मिटले ओठ .......नकळत तयांनी निर्दयी व क्रूर वार माणुसकीची हार धक्यांचा कहर सनकी लहर सैतानी पावर .......वापरली तयांनी मृत्यूचे जाळे कुना न कळे वेदनांनी विव्हळे रक्ताचे थारोळे देशाचे जवान दहशतवाद्यांना कंठस्नान माणुसकीची जान देशाची शान .......वाढवली तयांनी पोलीस शाहिद अधिकाऱ्यांचे बलिदान जवानांचे योगदान देशाची मान .......... उंचावली तयांनी जय हिंद अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी 8424043233 ...