उणीव


उणीव

करत असता काम कुठले
मनात आठवणींचे वादळ उठले
असावा जवळी मनास वाटले
पुन्हा नयनी अश्रू दाटले

प्रेम देऊनी मला तुझे 
सर्वस्व घेतले तू माझे
हे एकलेपणाचे ओझे
कुठवर वाहू सांग मी

देह असूनही इथे
भान हरपते माझे
सतत विचार तुझे
न आठवे काही दुजे

लावूनी लळा मला
का तू दूर गेला
माझे प्रेम असूनही
पारखे झाले मी त्याला

इथे एकांती जीव क्षिणला
गुन्हा कोणाचा अन सजा कुणाला
कसे समजावू मी या खुळ्या मनाला
उदास होई प्रत्येक क्षणाला



अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल 
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत