प्रिये जिंकलस तू मला...



                         प्रिये जिंकलस तू मला

खरंच एवढ्या दिवसातून 
आज सुंदर वाटली ती
का कुणास ठाऊक
हृदयाच्या अंदर वाटली ती

तिचा तो साज शृंगार पाहून 
खरच मन भारावून गेलं
तुझ्यासारखी बायको मिळाली
लय भारी नशीबच सालं

का कुणास ठाऊक आज
फिकी वाटली तुझ्यापुढे नटी
सामावून तुला श्वासात 
बंद केली काळजाची पेटी

धस्स करून गेलं काळजात
तुझं ते नाजूक हास्य 
आज उलगडलं मला
तुझ्या सौंदर्याच रहस्य

तुझी ती मनमोहक अदा
अन घायाळ केलंस मला
तुझ्या लोभस लाजण्याने
प्रिये जिंकलस तू मला

अजय द चव्हाण
उर्फ (राहुल)
*खाकी वर्दीतील दर्दी कवी*
8424043233

टिप्पण्या

Tushar Kasure म्हणाले…
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
एकदम झक्कास कविता
Unknown म्हणाले…
अतिशय सुंदर कविता आहे खरचं खुप छान खुपचं छान आहे

Unknown म्हणाले…
तुमच्या काव्यरचनेला शब्द नाही खूप छान सर😊

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत