घेऊनी ये तू तो स्पर्श पुन्हा......




घेऊनी ये तू तो स्पर्श पुन्हा

तू वाटे मज जवळी
मग ती ओढ कसली
कळी मनीची गोड हसली
नकळत ती काळजात घुसली
घुसुनी मग ती अशी खुलली
दुरी अंतराची का ती भुलली
याची वाच्यता ना कोणा.....
                घेऊनी ये तू तो स्पर्श पुन्हा



तो मस्त गंध प्रीतीचा

वाढवती हर्ष पतीचा
घट्ट तो बंध मिठीचा
मधुर तो स्वाद ओठीचा
मज प्रीतीचा खेळ जुना
               घेऊनी ये तू तो स्पर्श पुन्हा



कधी ओठांशी छेडले

कधी नयनांशी भिडले
मनी अजूनही गुपित दडले
स्वप्नी नव्हते ते ही घडले
घडावा फिरुनी तोच गुन्हा
            घेऊनी ये तू तो स्पर्श पुन्हा



तू अंतरीची आस पाही 

हा मनीचा भास नाही
तुजवीण मज कोण खास नाही
ना हृदयातील श्वास काही
मी खुळी की खुळी प्रीत म्हणा
           घेऊनी ये तू तो स्पर्श पुन्हा



शब्दरचना

✍✍✍✍✍
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
सुदर सर, नात्यातील दुरावा व त्यातील प्रेम,
खूपच सुंदर कविता सर
Unknown म्हणाले…
खुप छान सर 💐👌

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत