लावणी



                                      लावणी

*तुम्ही म्हणता ओ वन्स मोअर*


तुम्ही म्हणता ओ वन्स मोअरं
माझ्या जीवाला लागतो घोर.....
मी नाचून थकले बाई
तुम्हा येतो हो आणखी जोर...

मी अशी नजरेची जादू दावली
माझी अदा तुमा का हो भावली
त्याचे असे ग हातवारे 
मी विसरून जाते सारे

शीळ वाजवी नाजूक अशी 
माझ्या दिलाचा हाय तो चोर
तुम्ही म्हणता ओ वन्स मोअरं
माझ्या जीवाला लागतो घोर.....

सारखा तुमचा हो वन्स मोवरं
नाही थकायची मी तोवर
अशी इश्काची जादू माझ्या
तुमा करायची नाही बोअर


तुम्ही अस बघा
थोडी द्या हो जागा
तुमच्या हृदयी खोलवर 
तुम्ही म्हणता ओ वन्स मोअरं
माझ्या जीवाला लागतो घोर.....

तुम्हा खुणवते मी बाई
माझ्या मनात आहे काही
अस मनातलं अस स्वप्नातलं 
येउद्या ओठावर
तुम्ही म्हणता ओ वन्स मोअरं
माझ्या जीवाला लागतो घोर.....

मी ल्यायले देखणा साज
तुम्हासाठीच नटले आज
मी तोडले लाजेचे घुंगरू
शाल प्रीतीची तुमच्या पांघरु

आता नका हो नाही म्हणू
मी जाहले तुमची जणू

तुमा बिनती करते 
थोडा मस्का मारते
सारं करू लगीन झाल्यावर...
तुम्ही म्हणता ओ वन्स मोअरं
माझ्या जीवाला लागतो घोर.....

*लावणीची शब्दरचना चाल सहित*
अजय दत्तात्रय चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233

टिप्पण्या

Tushar Kasure म्हणाले…
शब्द सम्राट अजय चव्हाण खूप छान

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत