आला आला 6 मार्च



*SRPF वर्धापन दिन*

आला आला  6 मार्च 
आम्हाला वर्धापन दिनाची आच
रूबाबदार चालतो आम्ही
 लावून जमिनीवर टाच

नजर आमची समोर आणि
हाताची स्विंग असते
बाकी सगळे बघे अन
तुकडी किंग असते

रणांगणात हि नेहमी 
असतो आम्ही सतर्क
दुश्मन हि लावू शकत नाही
आमच्या योजनांचा  तर्क

निशाण आमच्या समोर
आणि सलामी शस्त्र असते
नजर दिपवून टाकेल असे
अंगावर वस्त्र असते

करताना हर्ष फायर
सन्मानाने पाहतो
आपले सर्वस्व तो
खात्यासाठी वाहतो

तिन्ही लोकी झेंडा आमचा अन
मान असते ताठ 
नोकरी खडतर आहे ही
 संकटाशी असते गाठ 

कधीच आम्ही  आमचा 
विकला नाही इमान
म्हणूनच सुंदर होत गेली
आमच्या शिस्तीची कमान

SRPF जवान असल्याचा
बाळगतो आम्ही गर्व
नाव उज्वल करू खात्याचे
मिळून आम्ही सर्व

👆👆👆👆
अजय द चव्हाण
उर्फ (राहुल)
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233

टिप्पण्या

Tushar Kasure म्हणाले…
जय हिंद
जय हिंद की सेना
Unknown म्हणाले…
Very good sir Jai Hind
Avinash Darade म्हणाले…
1 ch number..,Sirr👌👌👌
Avinash Darade म्हणाले…
1ch number...sirr 👌👌👌

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत