सांग कधी येशील......


सांग कधी येशील.....

प्रेमाची दिव्य ज्योत बनून
सुखाची पंचारती ओवाळीत
आनंदाची उधळण करीत
अनावर भावना पुशीत माझ्या
सांग कधी येशील कुशीत माझ्या

आतुरलेल्या नायनांना सुखावत
नायनातील नयनात बोलत
नायनांना पाझर फोडत
अश्रू बनून नजरेत हासत
सांग कधी येशील गाली माझ्या

काळजाचे ठोके चुकवीत
स्वतःचे अस्तित्व विसरीत
मनाचे तार छेडीत
धडकन एक बनूनी
सांग कधी येशील हृदयात माझ्या

काळोख्या रात्रीला जागवत
पौर्णिमेच्या शीतल चांदण्यात
गुलाबी थंडीत मनाशी बिलगत
पहाटेच्या दवबिंदुप्रमाणे 
सांग कधी येशील स्वप्नी माझ्या

नजरेला नजर भिडवत
स्पर्शाचा सुगंध दरवळत
ओठातील अमृत घेऊनी
श्वास एक करीत
स्वतःला माझ्यात हरवत
सांग कधी येशील मिठीत माझ्या

चिमुकल्याचे स्वप्न रंगवीत
हर्षाचे तुषार उडवीत
संसाराचे सप्तरंग फुलवीत
इंद्रधनुष्यी कमान बनून
सांग कधी येशील जीवनी माझ्या

सांग कधी येशील जीवनी माझ्या

अजय दत्तात्रय चव्हाण 
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवानिवृत्ती समारंभ

दुनियेची रीत