गारपीट
गारपीट
कष्ट करून घाम गाळून
रचतो संसाराची वीट
काळजावर घाव तो
अवकाळी ही गारपीट
मातीतुन अंकुरलेलं
हाती आलं फळ
सोसवेना आता ही
अंतरीची कळ
निष्पाप मुक्या पक्ष्यांचे
गेले निष्कारण जीव
निसर्गाला तरी सांगा त्यांची
कशी येईल कीव
निष्पाप मुक्या पक्ष्यांचे
गेले निष्कारण जीव
निसर्गाला तरी सांगा त्यांची
कशी येईल कीव
बरसलेल्या गारांचे
बघताना पांढरेशुभ्र गोळे
कुठे लपवावेत सांगा हे
रडून सुजलेले डोळे
हाता तोंडाशी आलेला घास
का हिरावून घेते नियती
हिरमुसलेल्या लेकरांची
लागेल कोणास हाय ती
हाता तोंडाशी आलेला घास
का हिरावून घेते नियती
हिरमुसलेल्या लेकरांची
लागेल कोणास हाय ती
गारांच्या माऱ्याबरोबर
कुटंबाची चिंता मनी
घेतलेल्या कर्जाचा
सोडवले का गुंता कुणी
डोळ्यातल्या आसवांसोबत
उर ही जातो दडपून
उर ही जातो दडपून
कसे जगावे आयुष्य सांगा
गारांच्या माराने सडकून
कसे जगावे आयुष्य सांगा
गारांच्या माराने सडकून
शब्दरचना
✍✍✍✍
अजय द चव्हाण
उर्फ राहुल
खाकी वर्दीतील दर्दी कवी
8424043233
टिप्पण्या